विद्युत भागवत - लेख सूची

विभावरी शिरूरकर उर्फ मालतीबाई बेडेकर यांच्या लेखनाचे आकलनः सामाजिक इतिहासाच्या परिप्रेक्ष्यातून

१९०५ साली जन्मलेल्या बाळूताई खरे या लेखिकेने १९३३ साली कळ्यांचे निःश्वास नावाचा ग्रंथ श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या प्रकाशनपूर्व अवलोकनासह प्रसिद्ध केला. मराठी समाजामध्ये या लघुकथासंग्रहाने वादळ उठविले. त्या काळातील शिक्षित तसेच अविवाहित आणि नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्य आणि आकांक्षांबद्दल या लघुकथांमधून काही मांडले आहे. विशेष म्हणजे अशा स्त्रिया ज्या दडपणुकीच्या बळी ठरतात त्याबद्दल स्पष्टपणे बोट …